weekend plan
या विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या स्थळांना नक्की भेट द्या (must visit popular destinations in india) :
हंपी (Hampi) : हंपी हे पर्यटन स्थळ कर्नाटक राज्यात आहे. हे शहर 14 व्या शतकातील असल्याने या शहराला विजयनगर साम्राज्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात असल्याने हे एक ऐतिहासिक शहर आहे. जर तुम्ही हंपी या पर्यटन स्थळाला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. कारण हंपी हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मध्ययुगीन काळातील शहर आहे. या ठिकाणी भरपूर प्रमाणात पुरातन काळातील वस्तूंचा साठा आहे. आकर्षणाची बाब म्हणजे मंदिरात बारीक असे कोरीव नक्षीकाम आहे. त्यामुळे अनेक ऐतिहासिक प्रेमी या वास्तूस्थळाला आवर्जून भेट देतात.
आग्रा : पर्यटन स्थळांपैकी सर्वांचं आवडत ठिकाण म्हणजे आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल. जगातील सात आश्चर्यांपैकी हे एक ठिकाण आहे. हे आग्रा पर्यटन स्थळ यमुना नदीच्या काठी वसलेले आहे. ताजमहाल हे एक भारताच्या महान मुघल वारशाचे आणि प्रेमाच्या शाश्वततेचे प्रतीक आहे. ताजमहाल या पर्यटन स्थळाचा अनुभव घेणे म्हणजे भव्य मुघल साम्राज्याकडे परत जाण्यासारखे आहे. मुघल सम्राट शाहजहानने 1631 मध्ये आपल्या प्रेमळ पत्नी मुमताज महलला श्रद्धांजली म्हणून ताजमहाल स्मारक बांधले आहे.त्यामुळे आग्र्याला फिरायचं असेल तर तुम्ही ताजमहालला नक्की भेट द्यावी.
दार्जिलिंग : निसर्गप्रेमींना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर दार्जिलिंग हे स्थळ सर्वात बेस्ट आहे. या ठिकाणी फिरायला गेलेला प्रत्येक पर्यटक तेथील ट्रेकिंग, पर्वताचा मनसोक्त आनंद घेतात. दार्जिलिंग येथील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक असलेले पर्वत शिखर, टायगर हिल त्याच्या ट्रेकिंग मार्गांसाठी आणि माउंट एव्हरेस्ट आणि कांचनझोंगाच्या विहंगम दृश्यांसाठी सर्वात प्रसिद्ध आहे. मात्र जर तुम्हाला टायगर हिलवर जायचे असेल तर एखाद्याला सर्वात जुन्या चहाच्या मळ्यांतून जावे लागते. तसेच तुम्हाला माउंट एव्हरेस्टवर जाऊन सूर्याच्या पहिल्या किरणांचा साक्षीदार होता येते. त्यामुळे वीकेंडला फिरायचे जायचे असेल तर तुम्ही दार्जिलिंगला नक्की भेट देऊ शकता.
गोवा : जर तुम्हाला या वीकेंडला मनसोक्त आनंद घेयचा असेल तर तुम्ही गोव्याला जाऊ शकता. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी सर्वात जास्त पर्यटक भेट देतात. जे तुम्ही मित्र- मैत्रिणी सहलीचा विचार करत असाल तर गोव्यावला नक्की जाऊ शकता. गोव्यामध्ये तुम्ही बीच, नाईटलाइफ, विविध प्रकारचे मद्य यासारख्या बाबींचा मजा घेऊ शकता. गोव्यामध्ये तुम्ही अंजुना बीच या ठिकाणी जाऊ शकता. हे ठिकाण पणजीपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे. हे पर्यटन स्थळ ख्रिसमस आणि नूतन वर्षात आयोजित केलेल्या पौर्णिमेच्या पार्ट्याचे मुख्य आकर्षण आहे. याव्यतिरिक्त तुम्ही ऑक्टोबर महिन्यात देखील या ठिकाणाचा आनंद घेऊ शकता. गोव्यात दुसरं लोकप्रिय ठिकाण हे बागा बीच आहे. या ठिकाणी अभ्यागतांनी भरलेले आहे. या ठिकाणी शानदार नाइटलाइफ, मोहक सीफूड डिश, बीच-साइड पार्ट्या आणि वॉटर अॅक्टिव्हिटी यामुळे बागा बीच पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच गोव्यातील पर्यटन स्थळांपैकी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे.